haqseengineer.com
‘टाईम्स हायर एज्युकेशन रँकिंगच्या खंडातील विद्यापीठांची गुणांकने जाहीर झाली असून , त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संपूर्ण आशिया खंडात १०९ वा क्रमांक पटकवला आहे . विशेष म्हणजे , गेल्यावर्षी विद्यापीठ याच गुणांकनात १८८ व्या स्थानावर होते. तेथून हि झेप घेतली आहे. याच गुणांकनानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे भारतातील सर्व उच्च शिक्षण संस्था मध्ये सामाईक पणे ६ व्या स्थानावर आहे .
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एकूण मिळून ३६.४ गुण प्राप्त केले आहेत . त्यातही गेल्यावेळेच्या तुलनेत संशोधन व अध्यापन या मुद्यांवर अधिक सरस कामगिरी केली आहे.